भारत माता म्हणजे काय?
भारत माता म्हणजे गोरीपान,केस मोकळे सोडलेली, प्रसन्न सुस्नात आणि दागिन्यांनी मढलेली, हातात भागवत धर्माची पताका असलेली, भगवा झेंडाधारी सिंहावर बसलेली स्री असे चित्र डोळ्यासमोर येते.
मात्र हे एखाद्या हिंदू चित्रकाराच्या मनातील मातृभूमीविषयीचं कल्पनाचित्र असावं.मातृभूमीविषयीचं इतर धर्मियांच्या मनातील कल्पनाचित्र वेगळं असेल.असायला हवे.त्या कल्पनाचित्राला मुर्तरूप देऊन पुजन केलं किंवा जय जयकार केला तरी मातृभूमीचं काही नुकसान होईल असं वाटत नाही.
भारत माता हा एक विचार आहे. स्रीच्या रूपातील भारत मातेचं हे कल्पनाचित्र प्रतिक आहे. प्रत्यक्ष नव्हे.
प्रतिकानं प्रत्यक्षाची ओढ लावली पाहिजे एवढंच प्रतिकाचं काम.मात्र प्रतिकावरूनच वाद होणे म्हणजे प्रत्यक्षालाच अमान्य करणे होय.तिनं साडीच का घातली? हातात भगवाच का घेतला? हे प्रश्न निरर्थक वाटतात.
न पाहिलेल्या अनेक देव- देवतांची कल्पनाचित्रे आम्ही रेखाटली.उपासनेसाठी प्रतिकं निर्माण केली.धार्मिकस्थळं बांधली.
एका संस्थेत गेलो होतो.तिथं भारताचा मोठ्ठा उठावाचा नकाशा भिंतीवर रेखाटलेला होता.
हा नकाशा म्हणजेच भारत माता का?
इथली माती, माणसं,धर्म, जाती, चाली- रिती, सण- उत्सव, हिरवीगार शेतं, डोंगर.खोल- खोल द-या, खळाळणारे झरे, फेसाळत वाहणारे धबधबे, बर्फाच्छादित पर्वत शिखरे.ज्य़ा नद्यांच्या खो-यात पुरातण काळी मानवानं वस्ती केली.आपल्या संथ वाहणा-या पात्रांतील पाण्यानं आजुबाजूचा परिसर ज्यांनी समृद्ध केला.त्या पवित्र नद्या.
भारत देश या सर्वांचा बनलाय.भारताच्या नकाशात हे सर्व सामावलय; म्हणून भारताचा नकाशा हाच देव.
आम्ही जन्माला आलो तेव्हापासून आमचा देह इथल्याच अन्न पाण्यावर पोसला जातोय.मातीत मिसळेपर्यंत.या भूमीवर तर प्रेम असायलाच हवं.मातृभूच्या जय जयकारात कसला आलाय कमीपणा? कमीपणाच वाटत असेल तर हा कृतघ्नपणाच ठरेल.
मी तर अंतिम श्वासापर्यंत म्हणतच राहणार ....
' भारत माता की जय'

No comments:
Post a Comment