* ओढ *
चिमणीचं घरट माझ..
पाखर सार उडून गेलं
दुर देशीची ओढ त्यांना
मन माझ लुटून नेलं..
प्रत्येक सांयकाळी खंत माझी
हृदय माझ पाझरुन गेलं..
का? रे परतीची वाट सुनी सुनी
हृदय माझ जाळून गेलं..
पूर्वी प्रभाती असायची किलबिल
आता डोळे बिलबिल झालं..
ह्या वृद्ध पणाचा कुठला रे शाप
मरणं माझ भुलून गेलं..
ये ये पाखरा लगबगीनं...
बघ ओढ संपता संपत नाही
तुमची ती दिव्य आठवण रे
कधी हृदयातून उतरत नाही
चारा पाणी काही नको
डोळ्यांची पारणं फेडून जा
फक्त एकदा रे..
माझ सुनं घरट जागवू जा
येशील ना पाखरा...
प्रित माझी सांगत रे
वृद्ध झाली पंख माझी
साद तुझी मागते रे
ये दिशांनो, आगाजाचे नौबती बडवा
येणार आहेत माझी पाखरं..
हे वा-यांनो झुलत्या कमानी हलवा
माझ्या पाखरांस सोन्यांनी मढवा..
हे सुर्य तू आज शीतलता घे
हे वसुंधरा तू लता घे..
पर्जन्य तू सुर छेडता घे
हे मना तू प्रतिक्षा घे..
आस माझा का? कास रे
भोवती किती फिरतो रे..
का? त्या खोट्या पाखरांची
ओढ मला लावतो रे..
सोड बघ नयन..
धरा कसली नटली आहे
वारा ही गातोय गाणे
सुर कुठला उमटला आहे
वा रे हा तर आनंदी आनंद
मांडतो आहे...
ह्या जगण्यावर प्रेम करण्यास
सांगतो आहे..
किती छान निसर्ग..
माझ सुन घरटं भरतो आहे
माझ्या जगण्याचा आनंद
दुगणीत करतो आहे..
ओढ कधिच संपलीय..
ह्या डोंगर दरीत मी बहरलो आहे
खर सांगू का?...
ह्या वृद्ध पणात मी प्रेमात पडलो आहे
- महेश
Mdesale29999@gmail.com
8806646250
* बालपणाची - खंत *
सरता सरुन जात बालपण..
पण आठवणी मिटता मिटत नाही
खंत त्याची माझी मला..
मला सुखाने आजही जगता येत नाही
हिंदोळ्यात बालपणीच्या..
काळाकुट्ट आभाळ दाटतं
हृदय माझ आसवानी..
जर जरा फाटू लागतं
नको मझला काही..
बालमनाची खंत जाता जात नाही
येईल का रे पुन्हा बालपण..
आशा माझी सुटता सुटत नाही
आई च्या चरणकमलावर..
बाबाच्या सहवासात, आता ते घडणार नाही
माझ बालपण...
खंत, मला कधी जगता येणार नाही
- महेश देसले
8806646250
चिमणीचं घरट माझ..
पाखर सार उडून गेलं
दुर देशीची ओढ त्यांना
मन माझ लुटून नेलं..
प्रत्येक सांयकाळी खंत माझी
हृदय माझ पाझरुन गेलं..
का? रे परतीची वाट सुनी सुनी
हृदय माझ जाळून गेलं..
पूर्वी प्रभाती असायची किलबिल
आता डोळे बिलबिल झालं..
ह्या वृद्ध पणाचा कुठला रे शाप
मरणं माझ भुलून गेलं..
ये ये पाखरा लगबगीनं...
बघ ओढ संपता संपत नाही
तुमची ती दिव्य आठवण रे
कधी हृदयातून उतरत नाही
चारा पाणी काही नको
डोळ्यांची पारणं फेडून जा
फक्त एकदा रे..
माझ सुनं घरट जागवू जा
येशील ना पाखरा...
प्रित माझी सांगत रे
वृद्ध झाली पंख माझी
साद तुझी मागते रे
ये दिशांनो, आगाजाचे नौबती बडवा
येणार आहेत माझी पाखरं..
हे वा-यांनो झुलत्या कमानी हलवा
माझ्या पाखरांस सोन्यांनी मढवा..
हे सुर्य तू आज शीतलता घे
हे वसुंधरा तू लता घे..
पर्जन्य तू सुर छेडता घे
हे मना तू प्रतिक्षा घे..
आस माझा का? कास रे
भोवती किती फिरतो रे..
का? त्या खोट्या पाखरांची
ओढ मला लावतो रे..
सोड बघ नयन..
धरा कसली नटली आहे
वारा ही गातोय गाणे
सुर कुठला उमटला आहे
वा रे हा तर आनंदी आनंद
मांडतो आहे...
ह्या जगण्यावर प्रेम करण्यास
सांगतो आहे..
किती छान निसर्ग..
माझ सुन घरटं भरतो आहे
माझ्या जगण्याचा आनंद
दुगणीत करतो आहे..
ओढ कधिच संपलीय..
ह्या डोंगर दरीत मी बहरलो आहे
खर सांगू का?...
ह्या वृद्ध पणात मी प्रेमात पडलो आहे
- महेश
Mdesale29999@gmail.com
8806646250
* बालपणाची - खंत *
सरता सरुन जात बालपण..
पण आठवणी मिटता मिटत नाही
खंत त्याची माझी मला..
मला सुखाने आजही जगता येत नाही
हिंदोळ्यात बालपणीच्या..
काळाकुट्ट आभाळ दाटतं
हृदय माझ आसवानी..
जर जरा फाटू लागतं
नको मझला काही..
बालमनाची खंत जाता जात नाही
येईल का रे पुन्हा बालपण..
आशा माझी सुटता सुटत नाही
आई च्या चरणकमलावर..
बाबाच्या सहवासात, आता ते घडणार नाही
माझ बालपण...
खंत, मला कधी जगता येणार नाही
- महेश देसले
8806646250
No comments:
Post a Comment