**भेट**
दुर केव्हा उडून गेली अशी
डोळ्यादेखत माझी पाखरे
परतूनी या एकदातरी
लागली घरट्याला आस रे !
पंखात तुमच्या बळ यावं
म्हणून करूणा भाकली रे
उंच घेताच झेप तुम्ही
घरट्याला विसरले का रे ?
काडी काडी जमा करून
तुम्हासाठीच घर सजविलं
जीवनाच्या प्रत्येक क्षणी
प्रेमच तुमच्यात रूजविलं !
केव्हा सुटेल वादळ वारा
नाही आता भरवसा काही
घरटं कधी उडून जाईल
नाही याचा भरवसा काही !
एकदाच शेवटचं पिल्लांनो
घराकडे जरा उडून या
त्राण पंखातील जाण्यापूर्वी
आनंदाने एक भेट द्या !
🌹पी.नंदकिशोर 🌹
आकोट 9850681198
04-04-2016
दुर केव्हा उडून गेली अशी
डोळ्यादेखत माझी पाखरे
परतूनी या एकदातरी
लागली घरट्याला आस रे !
पंखात तुमच्या बळ यावं
म्हणून करूणा भाकली रे
उंच घेताच झेप तुम्ही
घरट्याला विसरले का रे ?
काडी काडी जमा करून
तुम्हासाठीच घर सजविलं
जीवनाच्या प्रत्येक क्षणी
प्रेमच तुमच्यात रूजविलं !
केव्हा सुटेल वादळ वारा
नाही आता भरवसा काही
घरटं कधी उडून जाईल
नाही याचा भरवसा काही !
एकदाच शेवटचं पिल्लांनो
घराकडे जरा उडून या
त्राण पंखातील जाण्यापूर्वी
आनंदाने एक भेट द्या !
🌹पी.नंदकिशोर 🌹
आकोट 9850681198
04-04-2016
No comments:
Post a Comment